सुकी नदीत बुडून मुलीचा मृत्यू

0

रावेर प्रतिनिधी । चिमुकल्या मुलीचा नदीत पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याची घटना रावेर तालुक्यातील उटखेडा शिवारातील पुलावर घडली.

विनोद तडवी हे आपली मुलगी सानिया आणि मुलगा अनिस यांच्यासह उटखेडा शिवारातील पुलावरून जात होते. यावेळी अनिस पाण्यात ओढला गेला. यामुळे वडिलांचे लक्ष नव्हते हे पाहून …’पप्पा भाऊ पाण्यात गेला, त्याला धरा’ असे सानिया ओरडली. सानियाचा आवाज ऐकताच वडिलांनी पाण्यात चाललेल्या अनिसला पकडले. मात्र याच वेळी सानियाचा पाय घसरून ती पाण्याच्या प्रवाहात ओढली जाऊन तिचा मृत्यू झाले. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. सहा वर्षाची सानिया ही कुंभारखेडा येथील शाळेत शिकत होती.