रावेर : रावेर कोविड सेंटरमधून खानापूर येथील दोन वर्षीय मुलीने कोरोनावर मात केली असून तिला घरी सोडण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी.महाजन यांनी विशेष लक्ष दिल्याने दोन वर्षीय मुलीने कोरोनावर मात करणे शक्य झाले आहे.
दहा दिवसांपासून सुरू होते उपचार
खानापूरच्या दोन वर्षीय मुलीचा कोरोना पॉझीटीव्ह अहवाल आल्यानंतर तिच्यासह आई-वडीलांना कॉरंटाईन करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी.महाजन यांनी या दोन वर्षीय चिमुकलीकडे विशेष लक्ष दिल्याने तिने कोरोनावर मात केली आहे तर तिच्या आई-वडीलांचा रीपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्यांनादेखील कोविड सेंटरवरुन डिस्चार्ज देण्यात आला आहे मात्र पुढील सात दिवस त्यांना होम कॉरंटाईन व्हावे लागणार आहे. आतापर्यंत पाच रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.