सुखद बातमी ; रावेर ग्रामीणमध्ये 40 टक्के पेशंट घटले
गटविकास अधिकार्यांकडून व्हिडीओ काँम्फरन्सद्वारे बैठक
रावेर : गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी तालुक्यात हॉटस्पॉट गावांना वेळोवेळी दिलेल्या भेटी व कुशल रणनीतीमुळे रावेर ग्रामीण भागात सतत सुरू ठेवलेल्या अँटीजन टेस्ट कॅम्पमुळे ब्रेक दि चैन अंतर्गत कोरोना रुग्ण संख्यवाढीला कमालीचा ब्रेक लागला आहे. गत आठवड्यापासून तालुक्यात 40 टक्के कोरोना व्हायसरचे रुग्ण घटले आहे.
ग्रामीण भागात 650 कोरोना रुग्ण अॅक्टीव्ह
एक सुखद बातमी पंचायत समिती प्रशासनाकडून आली आहे. सध्या ग्रामीण भागात 650 कोरोना पेशंट अॅव्टीव्ह आहे. आज सुध्दा कोतवाल यांनी कोरोना संदर्भात महत्वाची बैठक घेऊन कोरोनाला अंतिम ब्रेक लावण्यासाठी कंबर कसली. कोरोना संदर्भात रावेर तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांची गट विकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी ऑनलाईन व्हिडीओ कॉफ्ररन्सद्वारे बैठक घेतली. ब्रेक दि चैन संदर्भात सर्वांनी गांभीर्याने लक्ष घालूण कोरोना आटोक्यात आणण्याच्या सूचना ग्रामसेवकांना देण्यात आल्या. यावेळी बैठकीला सभापती कविता कोळींचादेखील सहभाग होता. यावेळी तालुक्यात ब्रेक दी चैन तोडण्यासाठी गावस्तरावर समितीने गावात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, विना मास्क फिरणार्यांवर कारवाई करावी, गावात कोरोना कॅम्प लावून सर्वांची तपासणी करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल ग्रामसेवकांना दिल्या.