तळेगाव दाभाडे : उकडीचे मोदक तयार करण्यासाठी येथील रुडसेट संस्थेच्या वतीने एकदिवसीय मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिरास महिलावर्गाचा उदंड प्रतिसाद लाभला. शिबिरात सहभागी झालेल्या सुगरण महिलांनी चविष्ट व आकर्षक असे उकडीचे मोदक तयार केले होते.
90 महिलांचा सहभाग
या प्रशिक्षण शिबिरात सुमारे 90 महिलांनी सहभाग नोंदविला होता. याप्रसंगी टाटा गृहिणीच्या सचिव सुमया गोसावी, कॅनरा बँकेच्या क्षेत्रिय कार्यालयाचे वरिष्ठ प्रबंधक दीपक दळवी, पुणे येथील नामांकीत सनदी लेखपाल समीर मेहेंदळे, संचालक सुनील मेहेंदळे व प्रशिक्षक संदीप पाटील, बावचे यांची उपस्थिती होती. झटपट उकडीचे मोदक विना कटकट तयार करणात हातखंडा असलेले प्रसन्न कांबळी यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थित महिलांना लहान-सहान युक्त्या सांगून नवीन व्यवसायाचा पाया रोवण्यासाठीचा एक नवीन आत्मविश्वास दिला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगिता गरूड, दिनेश नीळकंठ व रवी घोजगे यांनी विशेष परिश्रम घेतले.