नवी मुंबई । ऐरोली येथील सरस्वती विद्यालयाची विद्यार्थिनी सुचर्या देशमुख हिला शाळेच्या वतीने आदर्श विद्यार्थिनी बनण्याचा मान पटकावला. सुचर्या हिस प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.सरस्वती विद्यालयाच्या वतीने गुरुवारी 10 वीच्या विद्यार्थ्यांचा सेंड अप दिन साजरा करण्यात आला.
या शाळेत एकूण 110 विद्यार्थी 10 वीमध्ये आहेत. यामधून गेले वर्षभर वक्तृत्व स्पर्धा, निवेदन, खेळ, शालेय लेखी स्पर्धा आदीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले म्हणून सुचर्या देशमुख हिस आदर्श विद्यार्थिनी म्हणून शाळेच्या वतीने घोषित करण्यात आले. सुचर्या देशमुख हिचा सत्कार सरस्वती विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे आर्थिक नियंत्रक सि. बी.मूर्ती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका विशाखा चव्हाण, अध्यापिका स्वप्ना इंगळे व प्रिया पाटणकर आदी शिक्षक उपस्थित होते.