पाचोरा । आजच्या धावपळीच्या युगात एक सुजाण नागरिक होणे, ही काळाची गरज असुन आव्हानाला सामोरे जायचे असेल तर स्त्री व पुरुष यांच्यात भेदभाव न करता ध्येयाकडे यशस्वी वाटचाल करायला पाहिजे. परिस्थीतीवर मात करुन यशाचे शिखर गाठण्याचे ध्येय उराशी बाळगणारे विद्यार्थी कधीच अपयशी होत नाही. आपण जे जिवन जगतो त्या जगण्यावर विश्वास ठेवला पाहिजे. ज्यांचे विचार चांगले आहेत त्यांचेमधे आचार जिवंत असुन त्याला कधीच मरण नसते, असे उद्गार पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या मनिषा पाटील यांनी काढले. त्या गो.से. हायस्कुलमधे आयोजित 10 वी च्या विद्यार्थ्यांचा गुण-गौरव व गणवेश वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होत्या.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
राज्यघटनेने आपल्याला हक्क व कर्तव्य ह्या दोन गोष्टी दिल्या आहेत. परंतु आपण त्यातील फक्त हक्क बजावतो व कर्तव्य करत नाही. यशस्वीतेसाठी हक्क व कर्तव्यांची जाण ठेवली तर निश्चितच यश संपादन केले जावु शकते. तसेच वाचनाशिवाय तुम्ही निश्चित केलेले उद्दिष्ट कधीच गाठु शकत नाही. असेही मनिषा पाटील यांनी सांगितले. यावेळी दहावीच्या परीक्षेत यश मिळणविणारे अजय पाटील (प्रथम), सौरव निकुंभ (द्वितीय), अनिकेत पाटील (तृतिय), मानसी भिवसने व सायली पाटील (चतुर्थ), तर अपुर्वा पाटील (पाचवी) प्रथम पाच विद्यार्थ्यांचा गुण-गौरव तसेच गरजु विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. राज्यपातळी वरीलल चित्रकला स्पर्धेत येथील अक्षदा मनोज पाटील हिने बक्षिस मिळविले आहे.
सत्कार समारंभात मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व्ही.टी.जोशी, चेअरमन संजय वाघ, पोलिस निरिक्षक शामकांत सोमवंशी, संस्थेचे मानद सचिव एस. आर. देशमुख, शालेय समितीचे चेअरमन खलिल देशमुख, पिपल्स बँकेचे चेअरमन अशोक संघवी, मुख्याध्यापक एस.डी. पाटील, दगाजी वाघ, अर्जुनदास पंजाबी, प्रा. भागवत महालपुरे, नगरसेवक वासुदेव माळी, अशोक मोरे, सतिष चौधरी, सुभाष पाटील, सुधाकर पाटील सह मान्यवर व्यासपिठावर होते.
यांनी घेतले परिश्रम
खलिल देशमुख, पोलिस निरिक्षक शामकांत सोमवंशी, चेअरमन संजय वाघ यांनी विद्यार्थ्याना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक एस.डी. पाटील, सुत्रसंचालन महेश कौंडिण्य व आर.बी. बोरसे तर आभारप्रदर्शन ए.जे.महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक एल. एस. शिंपी, पी.जे.पाटील, पी.एम.वाघ, प्रमिला पाटील, एन.एस. पाटील, प्रमोद पाटील, सुनिल भिवसने, सागर थोरात, मोहन तळणीकर, आर.एल.पाटील सह शिक्षकेतर कर्मचार्यांनी सहकार्य केले. यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांची उपस्थिती होती.