सुटीच्या दिवसाचा ओव्हरटाईम पूर्ववत

0

भुसावळ । आयुध निर्माणी बोर्ड कोलकता यांनी दिलेल्या आदेशानुसार 1 एप्रिल ते 30 जून पर्यंत रविवार तसेच सुटीच्या दिवशी कर्मचार्‍यांना देण्यात येणारा ओव्हरटाईम बंद करण्यात आला होता. याबाबत भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने पाठपुरावा करुन ओव्हरटाईम पूर्ववत करण्यात यश मिळवले आहे. 1 जूलैपासून आयुध निर्माणी कामगारांना रविवार आणि सुटीच्या दिवशी कामांचा ओव्हरटाईम मिळणार असल्याची माहिती प्रतिरक्षा मजदूर संघाचे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य सतीश शिंदे यांनी दिली.

कोलकत्ता बोर्डाशी चर्चा
1 एप्रिल ते 30 जून दरम्यान रविवार सुटीच्या दिवशी आयुध निर्माणी कर्मचार्‍यांना ओव्हरटाईम देवू नये, असे आदेश कोलकता बोर्डाने दिले होते. भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने हा मुद्दा उचलून धरला. आयुध निर्माणी बोर्ड कोलकता यांच्याशी प्रतिनिधींनी चर्चा केली. ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड कोलकता येथे एपेक्स प्रॉडक्टीव्हीटी कौन्सिल मिटींग बैठकीतही भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने बाजू मांडली. आयुध निर्माणीतील मनुष्यबळ कमी असल्याने उत्पादन वेळेत पूर्ण करण्यासाठी ओव्हरटाईम दिला जातो, रविवार किंवा सुटीच्या दिवशी ओव्हरटाईम देवून वर्कलोड पूर्ण केजला जातो म्हणून कोणत्याही स्थितीत ओव्हरटाईम बंद करु नये, अशी मागणी करण्यात आली होती. यानुसार 23 जून रोजी रविवार सुटीच्या दिवशी देण्यात येणार्‍या ओव्हरटाईम संबंधी ऑर्डर देण्यात आली. यानुसार ऑर्डनन्स फॅक्टरीच्या महाप्रबंधक यांनी फॅक्टरीच्या निर्धारित वर्कलोड, उपलब्ध एसएमएच तसेच असलेली तफावत ही फॅक्टरी ग्रुप मेंबर यांना कळवून मेंबर, ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड यांच्या कडून ओव्हरटाईम उत्पादन पूर्ण करण्याससाठी मंजूर करुन घ्यावी, अशी ऑर्डर दिली आहे. ही ऑर्डर 1 जुलै पासून लागू होणार आहे.