सुट्टीच्या दिवशीही कर भरा

0

पिंपरी-चिंचवड : मिळकतकराची थकबाकीसह पहिल्या सहामाहीची रक्कम भरणा करण्याची 30 सप्टेंबरला मुदत संपत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने सर्व कर संकलन विभागीय कार्यालये दसर्‍याच्या सुट्टीच्या दिवशीही शनिवारी (दि. 30) सुरू राहणार आहेत, अशी माहिती सहआयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

मिळकतकर हा 1 एप्रिल व 1 ऑक्टोबर रोजी सुरू होणार्‍या सहामाही हप्त्याने आगाऊ देय असतो. थकबाकीसह पहिल्या सहामाही अखेर मिळकतकराची रक्कम 30 सप्टेंबर 2017 व दुसर्‍या सहामाहीची रक्कम 31 डिसेंबर 2017 अखेर भरणे आवश्यक आहे. या मुदतीत मिळकतधारक, भोगवटादार यांनी मिळकतकराचा भरणा केला नाही तर, थकीत पहिल्या सहामाही अखेरच्या रक्कमेमधील मनपा करावर दरमहा 2 टक्के व शासन करावर वार्षिक 10 टक्के शास्ती, व्याज रक्कमेची आकारणी 1 ऑक्टोबर 2017 पासून सुरू होणार आहे. थकबाकीसह संपूर्ण रक्कम भरून शास्ती, व्याज रक्कमेची आकारणी टाळावी, असे आवाहन सह आयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे.