भुसावळ । येथील सुतार समाजातर्फे भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी नवनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे व उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांचा जाहिर सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर नगरसेवक किरण कोलते, सुषमा पाटील, नितीन धांडे, संस्थापक अध्यक्ष दिलीप दिक्षीत, उज्वला दिक्षीत, अनिता शिरसाठ उपस्थित होते. जयंती उत्सवानिमित्त समाजातर्फे विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, चित्रकला, सामान्य ज्ञान परिक्षा घेण्यात आली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. तर नृसिंह मंदिरापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीदरम्यान महाराणा प्रताप हायस्कुलजवळी विश्वकर्मा चौकात खिचडी वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज अध्यक्ष राजेंद्र दांडगे यांनी केले. आभार संजय अंदुरकर यांनी मानले. सुत्रसंचालन स्वाती शेगोकार यांनी केले. यशस्वीतेसाठी किरण मिस्तरी, प्रविण वळसकर, अशोक रुले, प्रविण धुंदेले, संजय हिरे, प्रल्हाद अहिरे, गणेश शिरसाठ, दिपक वाघ, सुनिल जाधव, राजेंद्र सुतार, राजू पराळे, राजू सोनवणे, सुनिल शेगोकार, उत्तम मिस्तरी आदींनी परिश्रम घेतले.