जळगाव- संपूर्ण जगाची कसोटी पाहणाऱ्या या काळात संचार बंदी व संपूर्ण देश 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन मध्ये आहे .या काळात रोजच्या रोज कमाई करून उदरनिर्वाह करणाऱ्या अत्यंत गरीब कुटुंबांना पोट भरणे कठीण झाले आहे. उदा. सावखेडा बु .मधील एक महिला दोन मुलांसह अर्धपोटी राहून दिवस काढते आहे. तांबापुरातील एक महिला मुलींसह अक्षरशः भिक मागून उदरनिर्वाह करते आहे .कुठेही काम मिळत नाही. गरिबी असल्याने बँकेत कुठलीही शिल्लक नाही. हा मोठा कठीण प्रसंग गरिबांवर आला आहे.
सुधर्माने आपल्या पद्धतीने याचा सर्वे करून 1) मन्यारखेडा 2) खेडी खुर्द 3) बांभोरी( गिरणा) 4)नशिराबाद 5)तांबापुरा 6)सावखेडा बु.7) राजीव गांधी नगर8) समतानगर अशा आठ विभागातील एकूण 42 गरीब कुटुंबांना साधारणपणे प्रत्येकी 600 रुपयांचा किराणा सप्रेम भेट म्हणून दिला. यामध्ये गहू, तांदूळ, साखर, तुरदाळ, मटकी, चवळी इत्यादी साहित्य देण्यात आले.यावेळी मन्यारखेडा मधील भिल्ल वस्तीत महिलांच्या डोळ्यात पाणी आले. त्या म्हणाल्या ही खरी माणुसकीची भेट आहे संपूर्ण सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून सोशल डिस्टन्स राखून हा किराणा या सर्व कुटुंबांना देण्यात आला.
या बहुमोल कामासाठी सर्वश्री डॉ. प्रा. प्रवीण पुराणिक सर लाइफ सायन्स विभाग बहिणाबाई विद्यापीठ, तसेच मन:शक्ती परिवार ,जळगाव व सुधर्माचे सदस्य यांचे आर्थिक सहकार्य लाभले.
किराणा साहित्या सोबतच मन:शक्तीचे श्री. अभय खांदे यांनी पेन बाम, डेटॉल साबण ,तसेच गरीब विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड देखील देण्यात आले .विशेष म्हणजे सुधर्मा चे सदस्य श्री सूर्यकांत हिवरकर यांचे वडील भावाचे तीन दिवसांपूर्वीच सोलापूर जिल्ह्यात निधन झाले असून देखील त्यांना लॉकडाऊन मुळे तेथे वेळेवर पोहोचणे शक्य झाले नाही. मात्र या वैयक्तिक दुःखावर मात करून त्यांनी सुधर्माच्या या सामाजिक यज्ञात सक्रिय सहभाग घेऊन आपल्या रक्तात महात्मा फुले यांचे विचार रुजले असल्याचा आदर्श दाखवून दिला.
या लॉकडाऊन च्या अत्यंत आर्थिक अडचण असलेल्या काळात या गरीब कुटुंबांनाअडचणीच्या वेळी किराणाचा आधार मिळाल्यामुळे अनेक महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. सूर्यकांत हिवरकर, नितीन तायडे ,राहुल सोनवणे , शुभम हातागळे ,श्री राजेंद्र चौधरीसर, श्री दिनकर बाविस्कर, राहुल सोनवणे,प्रियंका झोडपे ,गायत्री पाटील यांचे सहकार्य लाभले.
सुधर्मा चे अध्यक्ष श्री. हेमंत बेलसरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.