ठाणे – ठाणे शहरात वास्तव्यास असलेल्या रायगड जिह्यातील सुधागड तालुकावासियांच्या विकासासाठी झटणार्या सुधागड तालूका रहिवासी सेवा संघ या संस्थेने सुधागड तालुक्यातील विविध शाळांना भेट देऊन पितृछत्र हरपलेल्या व गरीब गरजू 129 विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत व शालेय साहित्यांचे वाटप केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांनी संस्थेच्या या उपक्रमासाठी ठाण्या-मुंबईतील तालुक्याचे रहिवासी व देणगीदार यांच्या सहकार्यामुळेच एवढे मोठे शिवधनुष्य पेलत आहे.
विद्यार्थ्यांना मिळत असलेली आर्थिक मदतीचे विद्यार्थ्यांनी चीज केले पाहिजे. आम्हाला तालुक्यातील विद्यार्थी हा हा केवळ नोकरी करणारा नाही तर उद्याचा उज्ज्वल भविष्य दिसायला हवा. केवळ शालेय शिक्षण नाही तर माहिती तंत्रज्ञानाचे ज्ञान मुलांनी घेतले पाहिजे. त्यांनी डॉक्टर, इंजिनअर आणि स्वयंरोजगाराद्वारे व्यावसाय क्षेत्रातही नाव कमावले पाहिजे. त्यासाठी संस्था शक्य तितकी मदत करेल, मुलांनी शिक्षणावर भर देऊन पुढे तालुक्यासाठी, राज्यासाठी, देशाच्या विकासातही योगदान दिले पाहिजे, असा आशावाद मांडत संस्थेच्या उपक्रमास सहकार्य करणाऱया सर्व देणगीदात्यांचे अध्यक्ष घाडगे यांनी आभार मानले.