सुनंदा पुष्कर आत्महत्येप्रकरणी शशी थरूर यांच्या विरोधात २१ फेब्रुवारीपासून सुनावणी !

0

नवी दिल्ली-सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात दिल्ली सत्र न्यायालयात २१ फेब्रुवारीपासून काँग्रेस नेते खासदार शशी थरुर यांच्याविरोधात खटल्याची सुनावणी सुरु होणार आहे. शशी थरुर यांच्यावर क्रूरता आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात कोर्टाला सहकार्य करण्यासंबंधी भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.

कलम ४९८ अ आणि कलम ३०६ अंतर्गत थरुर यांच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात मात्र त्यांना अद्याप अटक झालेली नाही.

१८ जानेवारी २०१४ रोजी दिल्लीतील फाईव्ह स्टार हॉटेलमधल्या खोलीत सुनंदा पुष्कर या मृतावस्थेत सापडल्या होत्या. थरुर यांच्या अधिकृत निवासस्थानाचे बांधकाम सुरु असल्याने त्यावेळी शशी थरुर आणि सुनंदा पुष्कर हॉटेलमध्ये रहात होते.