नवी दिल्ली- दिल्लीच्या पटियाला हाउस कोर्टाने सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी आज भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवर सुनावणी पुढे ढकलली आहे. आता २४ डिसेंबर रोजी ही सुनावणी होणार आहे. १८ डिसेंबर रोजी सुनावणी झाली होती.
स्वामी यांनी सुनंदा पुष्कर हत्येप्रकरणातील पुरावे नष्ट करण्यात आल्याचे आरोप केले आहे. मागील सुनावणीवेळी कॉंग्रस नेते शशी थरूर यांच्या वकिलांनी पोलिसांनी कोर्टात पुरावे सादर केले नसल्याचे सांगितले होते.कोणतीही सीडी उपलब्ध केलेली नाही, मेमरी कार्ड सादर केलेले होते, मात्र ब्लॅक होते.