सुनसगावच्या शेतकर्‍यांना निदर्शनापूर्वीच पोलिसांनी रोखले

0

भुसावळ । तालुक्यातील सुनसगावसह चोरवड परिसरात बेकायदा गावठी दारूची विक्री सुरू असल्याने महिलांच्या संसाराची राखरांगोळी होत आहे. तालुका पोलिसांकडे तक्रार करूनही कुठलीही दखल घेतली जात नसल्याने या भागातील महिला-पुरूष दोन ट्रॅक्टरद्वारे पालकमंत्र्यांकडे व्यथा मांडण्यासाठी येत असताना पोलिसांनी चोरवडजवळ त्यांना रोखून धरले. या प्रकारामुळे उभयंतांनी पोलीस प्रशासनाविषयी तीव्र रोष व्यक्त केला. नशिराबाद भागातील एक विक्रेता या भागात गावठी दारूची सर्रास विक्री करीत असल्याचा व तालुका पोलीस ठाण्यातील जिजाराव पाटील नामक पोलीस हप्ते घेण्यासाठी येत असल्याचा उघड आरोपही महिलांनी करीत कारवाई करण्याची मागणी प्रसंगी केली.