भुसावळ : तालुक्यातील सुनसगाव शिवारातील शक्ती पेपर मिलच्या आवारातील सामानाला शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली. या आगीत लाखोंचे नुकसान झाले.
लाखोंचे नुकसान झाल्याची भीती
सुनासगाव शिवारातील शक्ती पेपर मिल ही चुडामण सरोदे व शशिकांत वाघूळदे यांच्या मालकीची मिल असून या मिलला शुक्रवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. यानंतर जळगाव महापालिकेच्या अग्निशमन दलास 11.45 मिनिटांनी फोनद्वारे कळविण्यात आले असता अग्निशमन दलाचे बंब तत्काळ रवाना झालेत. यावेळी वाहन चालक वसंत न्हावी, भरत बारी, रविंद्र बोरसे, नितीन बारी यांच्या पथकाने 2 बंब वापरून ही आग आटोक्यात आणली. आग आटोक्यात आणण्यासाठी समोर असलेल्या सुदर्शन पेपर मिलमधून या बंबाना पाणीपुरवठा करण्यात आला.