मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहानची नवीन वर्षाची सुरुवात खूपच गोड झाली आहे. सुनिधीने 1 जानेवारीला एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सूर्या रूग्णालयात संध्याकाळी 5.30 वाजता सुनिधीने मुलाला जन्म दिला. गायिका सुनिधी चौहान आणि संगीतकार हितेश सोनिक यांचे हे पहिलेच मूल असल्याने सध्या त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. आई व बाळाची प्रकृती ठणठणीत असल्याचे सूर्या रूग्णालयातील डॉक्टर रंजना धानु यांनी सांगितले.