सुनिल ग्रोव्हर रोमान्स करणार नोरा फतेही सोबत

0

मुंबई – गुत्थी, रिंकू भाभी आणि डॉ. मशहूर गुलाठी अश्या विनोदी भूमिका निभावणारा सुनील ग्रोव्हर प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर भरपूर हासवताना पाहिले आहे. त्याने काही हिंदी चित्रपटातूनही भूमिका केल्या. आता सलमानच्या ‘भारत’ चित्रपटात पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. यात सुनिल ग्रोव्हर भूमिका करीत असल्याबद्दल सलमाननेच त्याचा फोटो शेअर करीत सांगितले होते.

‘भारत’ चित्रपटात सुनिलची गाठ सौंदर्यवती नोरा फतेही हिच्याशी पडणार आहे. समजलेल्या माहितीनुसार सुनिल आणि नोरा या जोडीचा एक रोमँटिक ट्रॅक सिनेमात आहे. अगोदरच्या माहितीनुसार नोरा फक्त गाण्यात दिसणार होती. मात्र सुनिलने आग्रह धरल्यामुळे यात बदल केल्याचे समजते.