सुनिल देवधर यांचे बारामतीशीही नाते

0

बारामती : पूर्वांचल राज्यातील त्रिपुरा, मेघालय, नागालँड या भाजपाच्या राज्यातील विजयाचे शिल्पकार सुनिल देवधर हे आता सर्वांनाच परिचित झालेले आहेत. सुनिल देवधर यांचा बारामतीशीही ॠणानुबंध व स्नेहबंध जुळल्याच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. सन 1998 च्या दरम्यान देवधर हे बारामतीमध्ये बरेच दिवस संघाच्या प्रचार कार्यासाठी होते. त्यामुळे बारामतीकरांचे व देवधर यांचे स्नेहबंध असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकार्‍यांनी आठवणी काढून व्यक्त केले
1998 साली संघकार्याच्या प्रचारासाठी बारामती येथे आले होते.

महाराष्ट्रातील तालुका पातळीवर संघकार्याचा अभ्यास करण्याची जबाबदारी देवधर यांच्यावरती होती. त्यावेळी देवधर हे बारामतीमध्ये बराच काळ होते. पूर्वांचल राज्यातील जबाबदारीपूर्वी महाराष्ट्राचा तालुका पातळीवरचा अभ्यास सखोल पध्दतीने देवधर यांनी केला या अभ्यासाचा फायदा पूर्वांचल राज्यामध्ये देवधर यांना झाल्याचेही सांगण्यात आले. पूर्वांचल राज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी महाराष्ट्रात व्यवस्था केली होती. या व्यवस्थेचा एक भाग म्हणून देवधर यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी होती. पूर्वांचल राज्यात बारामतीतील संघाचे जेष्ठ कार्यकर्ते हनुमंतराव कोकरे यांचे चिरंजीवही कार्यरत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पुर्वांचल राज्यातील विधानसभेतील बाबु कोकरे यांचाही सहभाग होताच देवधर यांच्याबरोबरच कोकरे हेही या निवडणूकीत महत्त्वपूर्ण काम करीत होते.