सुनिल मोरे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार

0

अहमदनगर येथील लोकसत्ता संघर्षतर्फे शिक्षक पुरस्काराचे वितरण

शिंदखेडा । उभरत्या पिढीस ज्ञान देऊन भावी भारताचे भक्कम आधारस्तंभ तयार करणार्‍या शिक्षकांचे मनोबल वाढावे आणि त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी लोकसत्ता संघर्ष न्यूज अहमदनगर जिल्ह्यातील सावडे येथील माऊली सभागृह येथे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. धुळे जिल्ह्यातून शिंदखेडा येथील सुनिल मोरे यांची सदरील राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. त्यानुसार त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत ‘आदर्श शिक्षक रत्न’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.

सुनिल मोरे हे शिंदखेडा तालुक्यातील चुडाणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असून त्यांच्या नावीन्यपूर्व उपक्रमशीलतेमुळे त्यांना यापूर्वीही राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. समाजातील सर्वच स्तरातून त्यांचे यासाठी अभिनंदन करण्यात येत आहे.