अमळनेर- येथील सुनीता धनेश पाटील यांना पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे पीएच. डी. पदवी देण्यात आली. यशस्वीगृप ऑफ इन्स्टिट्यूट चिंचवड येथे शैक्षणिक विभाग प्रमुख सुनीता पाटील यांनी अप्लिकेशन ऑफ डेटा मायनिंग ‘टेकनॉलॉजी फॉर कस्टमर चर्ण परेडिक्शन इन इन्शुरन्स सेक्टर’ या विषयावर त्यांनी संशोधन केले. त्या जिल्हा बँकेचे माजी अधिकारी गुणवंत पवार व अमळनेर अर्बन बँकेच्या माजी संचालीका शोभा पवार यांच्या कन्या तर मारवड च्या रमेश पाटील यांच्या स्नुषा आहेत.