सुनील केंद्रेकर राज्याचे कृषी आयुक्त

0

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांत फेरबदल केले असून महावितरण विभागाच्या औरंगाबाद विभागाच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदावर झालेली सुनील केंद्रेकर यांची नियुक्ती रद्द करून राज्याच्या कृषी आयुक्त पदावर त्यांची नियुक्ती केली आहे.

कृषी आयुक्त पदावर असलेले विकास देशमुख यांची पुण्यात यशदाचे उपमहासंचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. व्ही. एन. कळंब यांना मुंबईत व्यवस्थापकीय संचालक चित्रपट आणि सांस्कृतिक विकास महामंडळ येथे पाठविण्यात आले आहे. नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात असलेले विभागीय अतिरिक्त आयुक्त अरूण उन्हाळे यांची मंत्रालयात मदत व पुनर्वसन विभागाच्या सहसचिवपदी नेमणूक करण्यात आली असून पुणे स्मार्ट सिटी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्त केलेले डॉ. अमित सैनी यांना मुंबईत सहआयुक्त विक्रीकर विभाग म्हणून पाठविण्यात आले आहे. शुल्क नियंत्रण समितीचे सचिव कमलाकर फंड यांना एकात्मिक बाल विकास विभागाच्या आयुक्त पदावर तर अप्पर आयुक्त आदिवासी विकास, ठाणे या पदावर असलेले चंद्रकांत डांगे यांची महावितरणच्या कल्याण विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक या पदावर पाठविण्यात आले आहे.