‘द कपिल शर्मा’ शोपासून कपिल शर्माशी वाद झाल्यानंतर दूर झालेला सुनील ग्रोव्हर आता छोट्या पडद्यावर पुन्हा येत आहे. सुनीलचा नवा विनोदी कार्यक्रम लवकरच सोनी चॅनलवर सुरू होणार आहे. ‘द कपिल शो’ बंद झाल्यानंतर सुदेश आणि कृष्णाचा ‘द ड्रामा कंपनी’ हा कार्यक्रम सुरू होता. पण या कार्यक्रमाने अपेक्षित टीआरपी न दिल्याने अखेर तो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुनीलचा नवा कार्यक्रम सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या जागी सुरू होईल. आपल्या नव्या कार्यक्रमाचे सुनील सध्या प्लॅनिंग करत आहे. नवा कार्यक्रमाची थीम काय असेल? तसेच इतर सीक्रेट्सही गुप्त ठेवण्यात आले आहेत.