मुंबई:कपिल शर्माचा एकेकाळचा जवळचा मित्र सुनील ग्रोवर सध्या सगळीकडे चर्चेत आहे. सध्या कपिल शर्मा इंडस्ट्रीत कुठेच नाही. सुनील ग्रोवर पण मात्र उसंत नाहीये. टीव्हीवर ‘गुत्थी’, ‘डॉ़ मशहूर गुलाटी’ नावाने प्रसिद्ध असलेल्यासुनील ग्रोवर ने छोट्या पडद्याच्या चाहत्यांचे अपार मनोरंजन केले. आत्ताही छोट्या पडद्याच्या चाहत्यांना सुनीलच्या पुनरागमनाची प्रतीक्षा आहे. पण खरे सांगायचे तर टीव्हीवर परतायला सुनीलकडे अजिबात वेळ नाही. पुढील वर्षांपर्यंत तरी तो टीव्हीवर परतणारा नाही.
सुनील व कपिलच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. पण अचानक त्यांच्या भांडण झाल्याची बातमी आली आणि पुढे सुनीलने कपिलसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा सर्वाधिक फटका कपिलला बसला. त्याच्या करिअरची गाडी यानंतर अशी काही घसरली की, अद्यापही ती रूळावर आलेली नाही.