कोलकाता । कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार्या सुनील नरेनने आयपीएलमध्ये एक अनोखा विक्रम केला आहे. गुजरात लायन्सविरुद्धच्या सामन्यात सलामीला खेळणार्या सुनील नरेनने केवळ 17 चेंडूत 42 धावांची खेळी साकारली. पण यावेळी नरेनने सर्व धावा केवळ चौकार आणि षटकाराने केल्या. नरेनने एकही धाव काढली नाही.
नरेनने आपल्या खेळीत तब्बल 9 चौकार आणि 1 खणखणीत षटकार ठोकत अशाप्रकारे त्याने 42 धावांची साकारत अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. आयपीएलमध्ये याआधी मुंबई इंडियन्सकडून सनथ जयसुर्या याने एकही धाव न घेता केवळ चौकारांनी 36 धावा केल्या होत्या. जयसुर्याचा हा विक्रम मोडीत काढून नरेनने नवा विक्रम प्रस्थापित केला. नरेनने प्रवीण कुमारच्या पहिल्याच षटकात तीन चौकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले होते.