जळगाव । सुन्नी मुस्लिम बांधवांचे सर्वात मोठे धर्मगुरु, प्रेषितांचे वंशज शेख अब्दुल कादीर जिलानी (सरकार गौसे आजम) यांच्या अकरावी शरीफ (जयंती)निमित्त सुन्नी जामा मस्जिद भिलपूरा व सुन्नी मुस्लिम बांधवांतर्फे जश्ने गौसीयाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी 29 रोजी भिलपूरा येथील इमाम अहमद रजा चौकात संध्याकाळी 7 ते 10 दरम्यान इज्तेमा(धार्मिक प्रवचन) असून याप्रसंगी मौलाना वासेफ रजा हे जश्ने गौसीया बाबतीत उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन कीरततील.
महिलांसाठी स्वतंत्र नमाज
शनिवार 30 रोजी जुलूस -ऐ-गौसीयाचे सकाळी 9 वा.आयोजन करण्यात आले असून या जुलुसची सुरुवात भिलपूरा येथील इमाम अहमद रजा चौकातून होऊन समाप्ती परत याच ठिकाणी दु.12 वाजेदरम्यान होईल. याच दिवशी जियारत-ऐ- मुबारक (गौसे आजम यांचे पवित्र केस) चे दर्शन हे बाद नमाजे जोहर ते बाद नमाजे असर(दु.2 ते 4) पुरुषांसाठी सुन्नी जामा मशिदमध्ये ठेवलेली असून स्त्रियांसाठी बाद नमाजे असर ते नमाजे मगरीबपर्यंत (दु.4 ते संध्या 6) दरम्यान भिलपूरा येथील लाल शा बाबा दर्गाच्या आवारात ठेवलेली आहे. उपस्थितीचे आवाहन सुन्नी जामा मस्जिदचे अध्यक्ष अयाज अली नियाजअली, मौलाना जाबीर रजा, मौलाना मोईनुद्दीन वास्ती व नवजवानाने अहेले सुन्नत शहरे जळगाव यांना केले आहे.