विमानातून डागले क्षेपणास्त्र
पोखरण : भारताचे ब्रम्हास्त्र म्हणून ओळखल्या जाणार्या ब्राह्मोस या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची आणखी एक यशस्वी चाचणी भारतीय संरक्षण आणि संशोधन विभागाने (डीआरडीओ) गुरुवारी घेतली आहे. विशेष म्हणजे, लढाई विमानामधून ही चाचणी घेण्यात आली असून, ही चाचणी यशस्वी पार पडली आहे. त्यामुळे हवेतून विमानामार्फतदेखील हल्ला करण्याची भारताची क्षमता सिद्ध झाली आहे. संरक्षण मंत्री नीर्मला सीतारामन यांनी स्वतः याविषयी माहिती दिली. ब्राह्मोसच्या या यशस्वी चाचणीसाठी त्यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले. सीतारामन म्हणाल्या, आज सकाळी 8.42 वाजता राजस्थानमधील पोखरण येथे ही चाचणी घेण्यात आली. भारतीय वायूदलाच्या युद्ध विमानामधून ब्राह्मोसच्या सहाय्याने अचूक हल्ला करण्यात आला. तो यशस्वी झाला. यामुळे भारतीय संरक्षण विभागाला आणखी बळ आणि चालना मिळणार आहे, असे सीतारामन यांनी सांगितले.