सुप्तगुण विकसित करुन स्वतःच्या पायावर उभे राहा

0

वरणगाव ।प्रत्येक माहिलांमध्ये विविध गुणांचे सूत्र असते. माहिलांनी ते आत्मसात करण्याची गरज आहे. परंतु राजकारात बहुतेक ठिकाणी प्रतिनिधी महिलाचे पती त्यांचे काम सांबाळतांना दिसून येतात मात्र वरणगाव नगरपालिकेत स्वता: महिला प्रतिनिधीत्वाचे कार्य करतांना दिसून आल्याने हि खरी महिलांमधील सक्षमता असून इतर महिलांनीही आपआपल्या क्षेत्रात सक्षम राहावे असे प्रतिपादन तहसिलदार मिनाक्षी राठोड यांनी केले. वरणगाव नगरपालिकेच्या सभागृहात आयोजीत सत्न्ार समारंभाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यांची होती उपस्थिती
यावेळी तहसिलदार मिनाक्षी राठोड यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा अरुणा इंगळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, गटनेते सुनिल काळे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, गणेश चौधरी, रविंद्र सोनवणे, इफ्तेखार मिर्जा, शेख सईद, अल्लाउद्दीन शेख, आरोग्य सभापती माला मेढे, नगरसेवीका रोहिणी जावळे, शशि कोलते, प्रतिभा चौधरी, जागृती बढे, डॉ. तनुजा भोईटे आदी उपस्थित होते.

यांचा केला सत्कार
यावेळी प्रतिभा तावडे, हसनुरबी तडवी, मंगला पाटील, सीमा पाटील, कुसुम भवणे, निर्मला वाणी, राजेश्री देशमुख, राजेश्री सिंगारे आदी महिलांचा वरणगांव नगरपालिकेतर्फे सामाजिक कार्य करणार्‍या महिला तसेच विविध क्षेत्रात काम करणार्‍या महिलांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन कल्याणी देशमुख तर आभार लिपीक संजय माळी यांनी मानले. यशस्वीतेसाठी गंभीर कोळी, कृष्णा माळी, प्रशांत माळी, संगीता भैसे, नलीनी सोनवणे आदी कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.