सुप्रिम कॉलनीत सिलेंडरचा स्फोट

0

जळगाव । शहरातील औद्योगीक वसाहत परिसरातील सुप्रीम कॉलनीत घरगुती गॅससिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना आज मंगळवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत पार्टीशनच्या दोन घरांचा पुर्णत: कोळसा झाला असून इतर तिन घरांचे आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सिलेंडर मधुन झालेल्या गॅसगळतीने हा स्फोट झाल्याचा प्राथमीक अंदाज असून आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असुन जिवीत हानी मात्र टळली आहे. दरम्यान, या स्फोटामुळे लागलेल्या आगीत काहींची जमापूंजी देखील जळून खाक झाली. घटनास्थळी दोन अग्निशमन बंब दाखल झाल्यानंतर पाण्याचा मारा करीत आग विझविण्यात आली.

सुप्रीम कॉलनी परिसरातील क्युबा नगर भागात मोलमजुरी-कंपन्यामध्ये कामावर जाणार्‍या मजुर वर्गाचा रहिवास आहे. परिणामी गाव तालूक्यातुन आलेला मजुरवर्ग येथे भाड्यावर खोल्या घेवुन वास्तव्याला आहे. मोहम्मद शफी गुलामअली पटेल यांच्या मालकच्या पार्टेशनच्या पाच घरांची चाळ आहे. पहिल्याच घरातील घरभाडेकरु नजीर गफुर पटेल यांच्या घरात सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास आगीचा भडका उडून प्रंचड अवाजासह गॅससिलेंडरचा स्फोट झाला. सिलेंडर स्फोटामुळे आगीने काही मिनटातच रौद्ररुप धारण करीत त्याच्या शेजारीच रहिवासी जैनुरबी साहेबु तडवी यांच्यास शकीला सलीम पटेल यांचे घर आगीच्या भक्षस्थानी पडले, समोरील रहिवासी शाकीर अली सुयूफ अली यांचे समोरील पक्केबांधकाम असलेल्या बंद घरालाही आग लागली. परीसरातील तरुणांनी धाव घेत जिवावर खेळून आग विझवण्यासाठी मदतकार्य राबवले.

अशी लागली आग
नजीर गफुर पटेल यांचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहे, त्याच्या घरात पती-पत्नीसह एक मुलगा असे तीन सदस्य असतात. आई-वडील दोघ दवाखान्यात असल्याने मुलगा जाकीर पटेल सकाळी कामावर जाणार असल्याने त्याची बहीण परवीन घरी डबा बनवण्यासाठी आली. डबा बनवुन ती पुन्हा घरबंद करुन निघुन गेली, याच वेळेस दरम्यान विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यानंतर पंधरा ते विस मिनीटांनी अचानक पटेल यांचे संपुर्ण घर आगीच्या ज्वाळांत गडप झाले,ए क सिलेंडरचा स्फोट झाला नंतर शेजारील रहिवासी जैनुर तडवी यांच्या घरातील एक सिलेंडर पेटले आणि आग वाढत गेली.

घराघरातून पाणी आणत आगीवर मारा
सुप्रीम कॉलनीकडे जाणार्‍या आर.एल. चौका जवळच औद्योगीकवसाहत परिसरात महापालीेचे अग्निशामकदलाचे कार्यालय आहे. आगीची माहिती दिल्यानंतरही अर्धाते पाऊतास उशिराने अग्नीबंब आला. तो पर्यंत परिसरातील नागरीक रहिवाश्यांनी घराघरातून पाणी आणुन आगीवर मारा केला. परीसरातच बांधकामावर कामाला असलेल्या तरुणांनीही मदतीसाठी धाव घेतली. दिडतासांच्या प्रयत्नाअंती आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, या आगीत दोन पार्टेशनची घरे पुर्णत जळून खाक झालीत. यातील एका महिलेने घराचे बांधकाम सुरू असल्याने पतीची मिळालेली पेन्शनची रक्कम घरात ठेवली असता ती देखील आगीत जळून राख झाली. घरातील संपूर्ण साहित्य जळाल्याने महिलेला धक्काच बसला व ती भुवळ येवून पडली.

जीवाची पर्वा न करता सिलेंडर काढले बाहेर
सुप्रिम कॉलनी परिसरात राहणारे अल्ताफ पटेल, शगीरपटेल, गुड्डू पटेल, शाहरुख पटेल यांनी आगीचे लोट उठत असतांना जीवाची पर्वा न करता मदतकार्य केले, यात अन्सार पटेल यांना डोक्याला दुखापत झाली आहे. तर तडवी यांचे घरातील आगीतून पेटते सिलेंडर बाहेर काढून अल्ताफने डबक्यात बुडवून विझवले. तीन तासानंतरही या सिलेंडर मधुन गॅसची गळती सुरूच होती. या गॅस गळतीमुळे देखील परिसरात गॅस पसरला होता. काही तरूणांनी गॅस एजसींच्या कर्मचार्‍यांना देखील संपर्क साधून घटनेची माहिती दिली परंतू उशिरापर्यंत एकही गॅस एजन्सीचा कर्मचारी घटनास्थळी आले नसल्याचे दिसून आले.

यांच्या घरांचे नुकसान
नजीर गफुर पटेल यांच्या घरात लागलेल्या आगीत काहीच शिल्लक उरले नसुन अडीच लाखांपर्यंत नुकसान झाले तर जैनुर बी साहेबु तडवी यांच्या घराचीही सारखीच परिस्थीत असुन सर्व कोळसा झाला यात त्यांचे 2 लाख पस्तीस हजाराचे नुकसान झाले आहे. शाकीला बी सलीम पटेल यांच्या घराच्या एका बाजुची भिंत जळून साहित्याचे पन्नास हजारा पर्यंत नुकसान तर शकुर अली युसूफ अली सैय्यद यांच्या पक्क्या घरात आगीचा प्रेवश होवुन साहीत्या खाक होवून 1 ते सव्वा लाखांचे नुकसान, कलीम हाफीज देशमुख याचे बंद पार्टीशनचे घर जळाले, मात्र मदतकार्यात पार्टेशन तोडावे लागले यात त्यांचेही 40 हजाराचे नुकसान झाले आहे.

पोलीसही घटनास्थळी
नजीर पटेल यांच्या घराला आग लागुन कानठिळ्या बवसवणार्‍या स्फोटात रांगेतच राहणारे घरमालक मोहम्मद शफी यांच्या घरातील महिलांसह शेजारील घरातील लहामुले महिलांनी जीव मुठीत घेत मिळेल ते घेवुन पळ काढला. औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील कुराडे, खंडागळे, बाळू पाटील, राजाराम पाटील, यांच्यासहीत इतर कर्मचार्‍यांनी धाव घेत जमाव नियंत्रीत करुन मदतकार्यात सहभाग घेतला. आग विझवण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यावर शाकीर युसूफअली यांच्या तक्रारीवरुन अकस्मीक आगीची नोंद औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.