नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला मोठा झटका दिला आहे. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे.
सुप्रीम कोर्टात याप्रकरणी आज मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी, सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना हटविण्याआधी निवडलेल्या समितीची परवानगी घ्यायला हवी होती. ज्या पद्धतीने सीव्हीसीने आलोक वर्मा यांना हटविले, ते संविधानाच्या विरोधात आहे, असे सांगत सुप्रीम कोर्टाने आलोक वर्मांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश रद्द केला.