मुंबई : मराठी अभिनेता सुबोध भावे सध्या लोकप्रियतेच्या यशोशिखरावर आहे. नुकताच त्याचा ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा बायोपिक प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. मात्र, सुरुवातीला सुबोध भावेने या बायोपिकला नकार दिला होता.
रंगभूमीचा पहिला सुपरस्टार काशिनाथ घाणेकर यांची भूमिका पडद्यावर साकारणे हे आव्हान असल्याचे, त्याने अनेकदा माध्यमांना सांगितले. मात्र, त्यांची वेषभूषा आणि त्यातही त्यांच्या निळ्या डोळ्यांसाठी सुबोधला लेन्सचा वापर करावा लागणार होता. या लेन्सच्या भीतीने सुबोधने या चित्रपटाला सुरुवातीला नकार दिला होता. मात्र , या चित्रपटात सुबोधने साकारलेली काशिनाथ घाणेकरांची भूमिका प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली आहे.