जळगाव । शहरात गेल्या तीन दिवसांपासून श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सुरु असलेल्या मनपा सुब्रतो मुखर्जी फुटबॉल चषक स्पर्धेचा समारोप झाला. 17 वर्षाखालील गटात मुलींमध्ये सेंट जोसेफने डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महाविद्यालयाचा 1-0 ने पराभव केला तर मुलांमध्ये स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाने रुस्तमजी इंग्लीश स्कूलचा 1-0 ने पराभव करुन सुब्रतो मुखर्जी चषक पटकाविले. सदरचा चषक, विजयी व उपविजयी पदक तसेच उत्कृष्ट खेळाडूचे चषक जैन स्पोर्टस् अॅकेडमीतर्फे देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
विजयी संघास उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, किशोर पाटील, फारुख शेख, अंजली देशमुख, प्रा.डॉ.अनिता कोल्हे यांच्याहस्ते पोरितोषीक देण्यात आले. उत्कृष्ट खेळाडूचा सन्मान वैष्णव बेंडाळे तर मुलींमध्ये रबाब तरवरी यांनी पटकावला. पंच म्हणून फारुख शेख, लियाकत अली, अ.मोहसिन, कादर तडवी, शाहीद शेख, चैतन्य निकम, अभिषेक पाडरकर, सुषमा ढेरे, धनंजय धनगर, रोहिणी सोनवणे आदीं होते.