सुब्रत पॉल डोप चाचणीत अपयशी

0

नवी दिल्ली । भारतीय गोलरक्षक सुब्रत पॉल डोप चाचणीत अपयशी ठरल्यामुळे त्याच्यावर अस्थायी स्वरूपात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. फुटबॉलपटू सुब्रतने निर्दोष असल्याचे सिद्ध करण्यासाठी ‘बी’ सॅम्पलची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

महासंघाचे सचिव कुशाल दास यांनी सांगितले, पॉल गेल्या महिन्यात झालेल्या स्पर्धेदरम्यान डोपिंगमध्ये दोषी आढळला. पॉलला चार वर्षांच्या बंदीच्या शिक्षेला सामोरे जावे लागू शकते. सुब्रतच्या ‘अ’ नमुन्यामध्ये बंदी असलेला पदार्थ आढळला आहे.