जळगाव। शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या सुभाषचौकातील पोलीस चौकीच्या नुतनिकरणाला नारळ फोडून प्रारंभ करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोही, उपनिरीक्षक कोसे, एकता रिटेल किराणा मर्चंट नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष ललित बरडीया, शब्बीर भावनगरवाला, प्रशांत कांकरीया, सुरेश पाटील, राजू आहुजा, ताराचंद कृपलानी, सुरेश मिस्त्री, कॉन्स्टेबल संजय भांडारकर, देसले, परेश ठाकूर आदी उपस्थित होते.
या पोलीसचौकीचे नुतनिकरण एकता रिटेल किराणा मर्चंट नागरी पतसंस्था करीत आहे. शहर पोलीस ठाण्यातील निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी नुतनीकरणाचा प्रस्ताव संस्थेकडे दिला आहे. शहराच्या मध्यवस्तीत 24 तास जनतेसाठी सेवा देणार्या पोलिसांना काही मुलभूत सुविधा मिळाल्या तर त्यांची कामाची क्षमता व जबाबदारी वाढते. त्यामुळे एकता रिटेल किराणा मर्चंट पतसंस्थेने पोलीस चौकीचे नुतनीकरण करावे अशी विनंती ठाकूर यांनी केली होती. त्यानुसार पतसंस्थेने नुतनिकरणाचा प्रस्ताव स्वीकारुन काम सुरू करण्यात आले आहे. नुतनिकरणात पाण्याची टाकी, स्वच्छतागृह, स्लायडिंग विंडो, ग्रील, ओटा आदी सुविधा नव्याने केल्या जातील. यावेळी आशिष रोही यांनी पतसंस्थेच्या सामाजिक कार्याचा गौरव करुन पोलिसांच्या सुविधेसाठी सहकार्य करीत असल्याबद्दल आभार मानले. एकता रिटेल किराणा मर्चंट पतसंस्थेवर विश्वास व्यक्त करुन नुतनिकरणाचा प्रस्ताव दिल्याबद्दल बरडिया यांनी आभार मानले.