सुमन भोंडवे यांना ‘श्यामची आई’ पुरस्कार जाहीर

0

उज्जैनचे जिल्हाधिकारी संकेत भोंडवे ठरले ‘श्याम’ : 23 फेब्रुवारीला गौरव

पिंपरी-चिंचवड : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पिंपरी-चिंचवड विभागातर्फे दिल्या जाणार्‍या ‘श्यामची आई’ सन्मानासाठी निगडी प्राधिकरणातील श्रीमती सुमन भोंडवे यांची निवड करण्यात आली. तसेच त्यांचे पुत्र व मध्यप्रदेशातील उज्जैनचे जिल्हाधिकारी संकेत भोंडवे यांना ‘श्याम’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. चिंचवडच्या ऑटो क्लस्टर सभागृहात 23 फेब्रुवारीला सायंकाळी 4 वाजता पुरस्कार प्रदान सोहळा होईल, अशी माहिती प्रसिद्धीप्रमुख रोहित खर्गे यांनी दिली.

ऑटो क्लस्टरमध्ये होईल सोहळा
विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या समारंभाचे उदघाटन डॉ. डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी डी पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभाला ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य, निवृत्त विभागीय आयुक्त दिलीप बंड, हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, भूमी इन्फ्राकॉमचे संचालक सुरेश शिरुडे आणि शिक्षणभूषण रामचंद्र जाधव, प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले उपस्थित राहणार आहेत.