सुमित्रा महाजन निवडणूक लढविणार नाही; स्वत: केली घोषणा !

0

इंदूर –लोकसभेच्या विद्यमान अध्यक्ष सुमित्रा महाजन यावर्षी लोकसभ निवडणूक लढविणार नसल्याची चर्चा होती. अखेर सुमित्रा महाजन यांनी ”मी आता लोकसभा निवडणूक लढवणार नाही. इंदूरमधील उमेदवारीबाबत आता पक्ष योग्य वाटेल तो निर्णय घेऊ शकतो, असे प्रसारमाध्यमांना लिहिलेल्या खुल्या पत्रात म्हटले आहे.

75 वर्षांवरील नेत्यांना उमेदवारी न देण्याबाबत भाजपाकडून धोरण निश्चित करण्यात आले होते. या धोरणामुळे पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना यावेळी उमेदवारी देण्यात आलेली नाही. तसेच पक्षाच्या इंदूरमधील दिग्गज नेत्या सुमित्रा महाजन यांच्या उमेदवारीबाबतही संभ्रम निर्माण झाला होता. मावळत्या लोकसभेच्या अध्यक्ष असलेल्या सुमित्रा महाजन या इंदूर येथून सलग आठवेळ लोकसभेवर निवडून आल्या होत्या. तसेच 80 वर्षीय सुमित्रा महाजन यांची इंदूरमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता असल्याने त्यांना उमेदवारी नाकारणे पक्षश्रेष्ठींना शक्य होत नव्हते. अखेरीस सुमित्रा महाजन यांनीच निवडणूक न लढवण्याची घोणषा करून ही कोंडी फोडली.