सुमित मलिक राज्याचे नवे मुख्य सचिव 

0
मुंबई राज्याचे राजशिष्टाचार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुमित मलिक यांनी आज मंगळवारी तत्कालीन मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडून पदांची सूत्रे स्विकारली.
मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय हे ३१ जानेवारी २०१६ रोजी निवृत्त होणार होतेमात्र त्यांना एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होतीत्यामुळे क्षत्रिय हे २८ फेब्रुवारी रोजी निवृत झालेसुमित मलिक हे १९८२ च्या बँचचे आयएएस अधिकारी असून मुख्य सचिव पदाची सुत्रे स्विकारण्या आधी त्यांच्याकडे राजशिष्टाचार आणि सामान्य प्रशासन विभागाचा पदभार होता.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी सकाळीच दिल्लीला जाणार होतेमात्र मुख्यमंत्र्यांनी सोमवारी सकाळीच मलिक यांच्या नियुक्तीची फाईल मागवत त्यावर सही करत त्यांच्या मुख्य सचिव पदाच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले.
राज्याच्या प्रशासनात मलिक हे क्षत्रिय यांच्या पाठोपाठ सर्वात ज्येष्ठ सनदी अधिकारी म्हणून परिचित आहेतएप्रिल २०१८ ला ते सेवा निवृत्त होणार आहेत.
यापूर्वी मलिक यांनी अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त आणि शालेय शिक्षण विभागाचे सचिव म्हणून काम पाहिलेतसेच मलिक यांनी काही काळ राज्यपालांचे सचिव म्हणून ही काम पाहिले आहे.