सुरक्षादलाकडून ३ दहशतवाद्यांचा खात्मा

0

श्रीनगर-जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे सुरक्षादलाबरोबरल चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. राज्यात शस्त्रसंधी मागे घेतल्यानंतर सुरक्षादलाकडून दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरू आहे. श्रीगुफवारा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची सुरक्षादलाला माहिती मिळाली होती. संपूर्ण परिसराला सुरक्षादलांनी घेराव घातला होता.

 

यादरम्यान झालेल्या चकमकीत तिन्ही दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यास भारतीय सुरक्षादल यशस्वी ठरले. या चकमकीदरम्यान, एक पोलीस हुतात्मा झाला असून दोन नागरिक जखमी झाल्याचे जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक एस पी वेद यांनी माध्यमांना सांगितले.