श्रीनगर । जम्मू काश्मिरमधील कुलगावमध्ये शनिवारी सुरक्षादलाने केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये 16 वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. कुलगावच्या रेडवनी परिसरात लष्कराच्या एका तुकडीवर आंदोलकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. या प्रतिकार म्हणून सुरक्षाजवानांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामध्ये तीन नागरिकांचा मृत्यू झाला.
आतंकवाद्यांची शोधमोहिम या परिसरात सुरू असल्याने झालेल्या चकमकीत 22 वर्षीय शाकीर अहमद, 20 वर्षीय इरशाद माजिद आणि 16 वर्षीय अंदलीब या तिघांचा मृत्यू झाला. हे सर्वजण कुलगावच्या हावुराचे रहिवाशी आहेत. तर दुसरीकडे चकमकीत 10 आंदोलक जखमी झाले आहेत. यामध्ये दोन जणांना गोळी लागली आहे. रुग्णालयात नेत असताना एकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुलगाव आणि अनंतनाग जिल्ह्यात मोबाईल तसेच इंटरनेट सेवा तत्काळ बंद करण्यात आल्या आहेत. तथापि आफवा पसरण्यास अटकाव होईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.