सुरक्षारक्षकाची डोक्यात दगड घालून हत्या

0

पुणे :- शहरातील गुन्हेगारी काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. चांदणी चौकात आज सकाळी अज्ञात मारेकर्‍याने एका सुरक्षारक्षकाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. जीवनलाल रामसुरत मिस्तिकल (63,रा.वारजे माळवाडी, पुणे) असे हत्या झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. अशा घटनांमुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, जीवनलाल वारजे चांदणी चौक नजीकच्या केसीपीएल कंपनीत कामाला होते. जीवनलाल हे रात्री नेहमीप्रमाणे कामावर आले होते. मध्यरात्री जीवनलाल यांच्यावर हल्ला करण्यात आला असावा. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाला आहे. हिंजवडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात आला आहे. या घटनेचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे.