सुरक्षा दलाच्या जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

0

श्रीनगर-जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये आज रविवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर तेथून मोठ्या प्रमाणात शास्राश्त्रे आणि दारूगोळा हस्तगत करण्यात आला आहे. सध्या परिसरात नाकेबंदी करुन शोधमोहीम सुरू आहे.

आज पहाटे शोपियान जिल्ह्यातील जैनापुरा परिसरात ही चकमक झाली. परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर येथे शोधमोहीम राबवण्यात आली होती. शोधमोहीम सुरू असतानाच दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर दोन्ही बाजुंनी गोळीबाराला सुरूवात झाली आणि दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं.परिसरात अजून दहशतवादी लपल्याच्या शक्यतेमुळे शोधमोहीम सुरू आहे.

ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळखही पटली असून अलबदर नवाज आणि आदिल अशी ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यापूर्वी शनिवारी दुपारी शोपियान जिल्ह्यातच दहशतवाद्यांनी तीन युवकांचे अपहरण करुन एकाची हत्या केली होती आणि अन्य दोघांना सोडून देण्यात आले होते.