सुरक्षा यंत्रणांनी केला १४ नक्षलवाद्यांना पाठविले यमसदनी

0

रायपूर-छत्तीसगडमध्ये सुरक्षा यंत्रणांनी नक्षल विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षा जवानांनी १४ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. सुकमा जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीदरम्यान १४ नक्षलवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश मिळालं आहे. सुरक्षा यंत्रणांना मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे.