श्रीनगर-जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाची घटना समोर आली आहे. पूंछ ब्रेगेड मुख्यालयाला यावेळी निशाणा लक्ष करण्यात आले होते. त्याचबरोबर शोपियां भागातही दहशतवाद्यांसोबत सुरक्षा रक्षकांची चकमक झाली. यामध्ये ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे.
शोपियां जिल्ह्यातील नंदीगाम भागात सुरक्षा रक्षकांना २ ते ३ दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर या भागाला वेढा देण्यात आला. दरम्यान, दोन्ही बाजूंकडून सुरु झालेल्या गोळीबारात सुरक्षा रक्षकांनी ४ दहशतवाद्यांना कंटस्नान घतले. तर यात एक जवानही शहीद झाला आहे. तर इतर दोन जवान जखमी झाले आहेत. ही चकमक आणि कारवाई अद्यापही सुरुच आहे.