सुरक्षित फोन, मेसेजिंग शक्य

0

बीजिंग | चीनच्या एका उपग्रहाने पृथ्वीवर हॅक न येणारा संदेश पाठवून आघाडी मारली आहे. मिसिअस उपग्रहावरून ६४५ किलो मीटर दूर आणि १२०० कि.मी दूर असणाऱ्या पर्वतांवर हे संदेश पाठविण्यात आले आहेत.

संदेशाचे संरक्षण कवच क्वांटम फिजिक्स या भौतिक शास्त्राच्या शाखेतील तत्वांचा अभ्यास करून तयार केले होते. कुणीही संदेश उघड करण्याचा प्रयत्न जरी केला तर ते सहज लक्षात येते. फोटॉनच्या योगे बदल लगेच नोंदविले जातात आणि संदेश मिळणाऱ्याला समजात.

जमिनीवर असणारी फोटॉन निगडित मेसेज मॉनिटरींग पद्धत एखादा मेसेज २०० किलोमीटर पर्यंतच गुप्त ठेऊ शकत होती. फायबर ऑप्टिकमधून पाठविलेल्या मेसज बाबत हे खरे होते. क्षीण झालेल्या मेसेजवर हॅकरचे हल्ले होऊ शकत होते. आता सेटेलाईटमधून पाठविलेले मेसेज जास्त अंतर कमी वेळात कापत असल्यामुळे क्षीण तर होत नाहीत शिवाय हॅकरनाही काही बदल करता येत नाहीत.

जिआनवी पॅन हे चीन प्रकल्पातील शास्त्रज्ञ सांगतात सुरक्षित फोन कॉल करणे किंवा बँकाचा डाटा पाठविताना या सेटेलाईट मेसेजिंगचा उपयोग होईल. मिसीअसवरून पाठविलेल्या संदेशाचा हा प्रयोग मेसेज सुरक्षित करणाऱ्या अनेक प्रयोगांपैकी एक होता असे जर्नल नेचरमध्ये म्हटले आहे.