सुरतहून विदर्भात पायी जाणाऱ्या नागरिकांसाठी खाकीतली माणुसकी पाझरली

0

यवतमाळ येथील १४ जणांची निवार्‍यासह केली जेवणाची व्यवस्था

जळगाव – भारत देशासह सर्वत्र लागून आहे संचारबंदीचे आदेश त्याने रेल्वेसह बस अशी सर्व प्रवासी वाहने बंद आहेत. त्यामुळे गावाकडे परतायचे कसे या विवंचनेत सुरतहुन थेट पायी विदर्भात जाणार्‍या नागरिकांसाठी खाकितली माणुसकी पाझरली आहे. जागा मार्गे प्रवास करत असलेल्या यवतमाळच्या चौदा जणांची एमआयडीसी पोलिसांनी निवासासह जेवणाची व्यवस्था केली आहे .

२८ रोजी सकाळी ११ वाजता पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांना सुरत येथुन काही नागरिक पायी विदर्भात जात असल्याबाबतची माहिती मिळाली. त्यानुसार शिरसाठ यांनी चौकशीसाठी सदर ठिकाणी सहाय्यक फौजदार अतुल वंजारी , आनंदसिंग पाटील , रामकृष्ण पाटील , इम्रान अली सैय्यद , मुद्दस्सर काझी , सचिन पाटील , मुकेश पाटील यांचे पथक रवाना केले.

मास्क सह सॅनिटायझरही केले वाटप

पथकाने अजिंठा चौफली गाठुन चौकशी केली. त्यानुसार पायी जात असलेल्या रणजीत परशुराम राठोड , निलेश विसावर राठोड , निखील प्रकाश चव्हाण , किशोर रामदास जाधव , निलेश जंगु पवार , राजु सुरेश राठोड , राहुल बबन मंडळ , साईदुल बारा गुलाम बारा , पोभीसेन सुनिल सेन , अविनाश पुंडलिक चव्हाण , प्रविण पुंडलिक पवार , सचिन शांताराम पवार , उमेश प्रेम राठोड , रबी मोहन राठोड सर्व रा. ता . दरवा , जि , यवतमाळ सर्वांची विचारपुस केली. सर्वांना जेवणासह निवार्‍याची आवश्यकता असल्याने देवा तुझा मी सोनार सेवाभावी संघटना व पातोंडकर ज्वेलर्सचे संचालक किरण शेठ पातोंडकर यांचेशी मदतीसाठी संपर्क साधण्यात आला. दोघांच्या सहकार्याने संबधित नागरिकांना मास्क व सेनीटायझर चे वाटप करण्यात आले.

जेवणासह राहण्याची केली सोय

यानंतर सर्व नागरिकांची शाम चव्हाण , शेख सादिक शेख मेहबुब , इम्रान खान अकबर खान , निजाम मुलतानी या सामाजिक कार्यकर्त्यांनी जेवणाची व्यवस्था केली. त्यानंतर घुगे पाटील ट्रान्सपोर्टचे गजेंद्र झिपरु पाटील यांनी वाहन उपलब्ध करुन देऊन संबधितांना एम . आय . डी . सी . पोलीसांनी वैद्यकीय तपासणीकामी जिल्हा सामान्य रुग्णालय , येथे रवाना केले. तपासणीनंतर सर्वांची राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे राहण्याची व्यवस्थाही करून देण्यात आली आहे. सहकार्याबद्दल यवतमाळच्या नागरिकांनी पोलिसांसह सामाजिक संघटना तसेच कार्यकर्त्यांचे आभार मानले आहे .