संगमनेर – सुरत-नाशिक-नगर हा सहा पदरी न्यू ग्रीन फील्ड रोड होणार असून नगर-शिर्डी सहा पदरी, नगर-पुणे आठ पदरीू, नगर-औरंगाबाद आठ पदरी, नगर-काष्टी-दौंड चार पदरी, आणि अहमदनगर-जामखेड दोन पदरी या १३ हजार ६०० कोटी रुपयांच्या नवीन कामांचीही लवकर सुरुवात होणार असल्याचिरे माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नगर येथे दिली . शुक्रवारी नगर शहरातील ३.०८ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाचे काम आणि अहमदनगर बाह्यवळण रस्त्याचे ४०.६०० किमी. चौपदरीकरणाच्या कामांचा कोनशीला समारंभ व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून . गडकरी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. शहरातील उड्डाणपूल आणि बाह्यवळण मार्गाच्या कामांमुळे तसेच जिल्ह्यात होणार्या विविध १३ हजार कोटी रुपयांच्या कामांमुळे विकासाचा वेग वाढणार असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे . नगर शहरातील छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्याजवळ मार्केटयार्ड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभेचे उपाध्यक्ष विजयराव औटी, खासदार दिलीप गांधी, महापौर बाबासाहेब वाकळे आदी उपस्थिती होते.