सुरत-पाचोरा बसला अपघात; ८६ प्रवाशी सुखरुप !

0

नवापूर: धुळे-सुरत महामार्गावर अपघातांची मालिका थांबता थांबत नसून अपघाताची दिवाळी नवापूर तालुक्यात पाहायला मिळाली आहे. आज मंगळवारी १७ नोव्हेंबर रोजी पुन्हा धुळे-सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी राज्य परिवहन महामंडळाची सुरत-पाचोरा बसचा अपघात झाला. भीषण असा हा अपघात टळला असून सुदैवाने ८६ प्रवासी सुखरूप आहे. समोरून येणाऱ्या टॅंकरने धडक दिल्याने हा अपघात झाला. बसचे नुकसान वगळता कोणत्याही जीवित हानी झाली नाही. सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे.

एमएच २०-३४३६ सुरतहुन पाचोराकडे जात असताना विसरवाडीपुढे कोंडाईबारी घाटात दहीवेलवरून येणारा टँकर क्रमांक जीजे १२-झेड-३७३९ वरील चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने एसटी बसला जोरदार धडक दिली.