खान्देशातील प्रवाशांना दिलासा : सुरत पॅसेंजरला ज्यादा स्लीपर डब्यासह दोन अतिरीक्त जनरल डबे जोडणार

0

भुसावल- सुरत-भुसावळ व भुसावळ-सुरत जाणार्‍या पॅसेंजरला अतिरीक्त स्लीपर बोगीसह अन्य दोन वाढीव जनरल डबे जोडण्यात येणार असल्याने खान्देशातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. पूर्वी असलेल्या एकाच बोगीमुळे अनेक प्रवाशांचे तिकीट कन्फर्म होत नसल्याने त्यांची गैरसोय होत होती शिवाय जनरल डबे कमी होत असल्याने गैरसोय होत होती मात्र आता वाढीव डब्यांमुळे समाधान व्यक्त होत आहे.

नेहमीसाठी जादा डब्यांची सोय
गाडी क्रमांक 59014 भुसावळ-सुरत पॅसेंजर व गाडी क्रमांक 59013 सुरत-भुसावळ पॅसेंजर या गाडीला 7 फेब्रुवारीपासून एक स्लीप क्लास व दोन जनरल बोगी जोडण्यात आली आहे. गाडी क्रमांक 59076 व 59075 तसेच 59078 व 59077 या भुसावळ-सुरत व सुरत-भुसावळ दरम्यान धावणार्‍या पॅसेंजरला प्रत्येकी एक स्लीपर बोगी तसेच दोन जास्तीच्या जनरल बोगी 7 फेब्रुवारीपासून लावण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रवाशांची या सुविधेमुळे आता मोठी सोय झाली आहे. दरम्यान, टू व थ्री टायर वातानुकूलित बोगी लावण्यासंदर्भातही रेल्वे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.