सुरेंद्र सिंहच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय शांत बसणार नाही: स्मृती इराणी

0

अमेठी: भाजप नेत्या स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अमेठीतील बारौली येथील माजी सरपंच सुरेंद्र सिंह यांची काल रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दरम्यान आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी स्मृती इराणी यांनी सुरेंद्र सिंह यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय शांत बसणार नाही अशी शपथ घेतली आहे. सुरेंद्र सिंह यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी मी सुप्रीम कोर्टात जाईल असे स्मृती इराणी यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

अंत्यसंस्काराला घेउन जात असताना स्मृती इरानी यानी सुरेंद्र सिंह यांच्या मृतदेहाला खांदा दिला. दरम्यान त्यांच्या हत्येप्रकरणी ७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी सुरु आहे.

https://janshakti.online/new/smriti-irani-lends-a-shoulder-to-mortal-remains-of-surendra-singh/