सुरेखा भोरडे बिनविरोध

0

वाघोली : वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुरेखा शिवाजी भोरडे यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत स्थापनेपासून भोरडे 27 व्या उपसरपंच म्हणून विराजमान झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जोगेश्‍वरी माता ग्रामविकास पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळविले होते.

ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरंपच अमोल गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये सुरेखा भोरडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. निवडणुक निरीक्षक म्हणून मंडलाधिकारी किशोर शिंगोटे, ग्रामविकास अधिकारी पी. एम.लोणकर यांनी काम पाहीले. भोरडे यांच्या निवडीनंतर वाडेबोल्हाईमध्ये विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. वाडेबोल्हाई गावाच्या विकासाच्या दृष्टीने विकास कामे करण्यास प्राधान्य देणार असल्याचे भोरडे यांनी सांगितले.