बीड : राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी करून भारतीय जनता पक्षाशी घरोबा करणारे माजी मंत्री सुरेश धस यांनी आपल्याकडील 5 जिल्हा परिषद सदस्य भाजपला देण्यासाठी पंकजा मुंडे यांच्याकडून तब्बल 15 कोटी रूपये घेतल्याचा घणाघती आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सोमवारी येथे केला. मुंडे यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सुरेश धस यांचे कट्टर विरोधक बाळासाहेब आजबे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्या वेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी धस यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रवादीशी बंडखोरी करून धस यांनी भाजपाशी जवळीक साधली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंडे म्हणाले, धस यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे. त्यांनी आपल्याकडील पाच जिल्हा परिषद सदस्य भाजपाला देण्यासाठी तब्बल 15 कोटी रुपये घेतले आहेत.